Skip to content

Pune Crime : पाण्याच्या प्लांटमध्ये कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे: शिरूर तालुक्यातील कारेगावच्या हद्दीत साईनगर येथील एका पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची अज्ञात इसमाने डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पाण्याच्या प्लांटमध्ये कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पाण्याच्या प्लांटमध्ये कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे: शिरूर तालुक्यातील कारेगावच्या हद्दीत साईनगर येथील एका पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची अज्ञात इसमाने डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कारेगाव व रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime

हामजा उस्मान शेख (वय ३९, मूळ रा. धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी; सध्या रा. साईनगर, कारेगाव, ता. शिरूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी अबिताबी हामजा शेख (वय ३७) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२९) सकाळी कारेगाव येथील साईनगरमधील विकास नवले यांच्या इमारतीजवळ असलेल्या 'समु एंटरप्रायझेस अॅक्वा रिच' या पाण्याच्या प्लांटमध्ये ही घटना घडली. मृत हामजा शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने कोणत्याही अज्ञात कारणावरून त्यांच्यावर पिस्तूल रोखून थेट डोक्यात गोळी झाडली. या गंभीर दुखापतीमुळे हामजा शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरडे आणि पोलीस हवालदार पोळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share