Skip to content

Pune News : स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना IMF-जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीचे निमंत्रण; पुण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

Pune News :पुणे : स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत गेनबा कांबळे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक समूहाच्या (WBG) २०२६ च्या वार्षिक बैठकीसाठी विशेष निमंत्रण मिळाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना IMF-जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीचे निमंत्रण; पुण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना IMF-जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीचे निमंत्रण; पुण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

Pune News :पुणे : स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत गेनबा कांबळे यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक समूहाच्या (WBG) २०२६ च्या वार्षिक बैठकीसाठी विशेष निमंत्रण मिळाले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ही अत्यंत प्रतिष्ठेची बैठक १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान बँकॉक, थायलंड येथे होणार आहे. या बैठकीत जगभरातील अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे प्रमुख, जागतिक उद्योग नेते आणि शिक्षणतज्ज्ञ जागतिक अर्थव्यवस्था, गरिबी निर्मूलन आणि सर्वसमावेशक विकास यावर चर्चा करणार आहेत.

१९९१ नंतर ३५ वर्षांनी थायलंडमध्ये होत असलेली ही बैठक आशियाच्या वाढत्या आर्थिक ताकदीचे प्रतीक मानली जाते.

पुण्यातील एका कार्यकर्त्यापासून ते जागतिक व्यासपीठापर्यंत:
स्वान फाऊंडेशनच्या माध्यमातून शशिकांत कांबळे गेली अनेक वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी NASA आणि सिंगापूर सायन्स सेंटरच्या सहकार्याने परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरे आयोजित करतात. त्यांच्या याच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना या जागतिक मंचावर निमंत्रित करण्यात आले आहे. भारती विद्यापीठात १३ वर्षे त्यांनी जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून सेवा बजावली असून, हा त्यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरव आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share