Skip to content

पुणे जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू

शाळांच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे सुट्टीचे वेळापत्रकही जाहीर

PG
Prashik Ghaste

1 min read

पुणे जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू

शाळांच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे सुट्टीचे वेळापत्रकही जाहीर

निलेश राऊत
पुणे
: पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे सुट्टी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचे सुट्टीचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक शाळांना या संदर्भातील परिपत्रक पाठविले आहे.

परिपत्रकानुसार, सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. पहिले सत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. दिवाळीनंतर सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

शाळांना सुट्टयांचे समायोजन करण्याची मुभा
दुसरे सत्र १ मे २०२७ पर्यंत चालणार असून, ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी राहणार आहे. यंदाच्या वेळापत्रकात शाळांना सुट्टयांचे समायोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. गणेशोत्सव, नाताळ यांसारख्या सणांसाठी उन्हाळी किंवा दिवाळी सुट्टी कमी करून सुट्टया देता येणार आहेत. मात्र, एकूण सुट्टयांची मर्यादा ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही, तसेच किमान २३० कामकाजाचे दिवस पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

मोहरम, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, दसरा, दिवाळी, प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा आदी प्रमुख सणांच्या सार्वजनिक सुट्टयांचा समावेश यादीत करण्यात आला आहे.

पुणे न्यूज

Share