Skip to content

Mumbai news : तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या सतीश कुलकर्णी यांना विजेतेपद

Mumbai news : मुंबई : मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना व कल्पवृक्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 75 वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या सतीश कुलकर्णी याने विजेतेपद संपादन केले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या सतीश कुलकर्णी यांना विजेतेपद
तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या सतीश कुलकर्णी यांना विजेतेपद

Mumbai news : मुंबई : मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना व कल्पवृक्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 75 वर्षांवरील पुरुष गटात पुण्याच्या सतीश कुलकर्णी याने विजेतेपद संपादन केले. मुंबई, मरीन लाईन्स येथील युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या सतीश कुलकर्णीने तिसऱ्या मानांकित आपला शहर सहकारी दिलीप कुडतरकरचा 11-3,11-5,11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याआधी उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात पुण्याच्या सतीश कुलकर्णी याने ठाण्याच्या चंद्रकांत मैनकरचा 11-8,11-5,11-4 असा तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित पुण्याच्या दिलीप कुडतरकरने मुंबई उपनगराच्या दुसऱ्या मानांकित पिनाकिन संपतचा 14-12,15-13,7-11,6-11,11-9 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

निकाल: 75 वर्षांवरील गट: उपांत्यपूर्व फेरी:
चंद्रकांत मैनकर(ठाणे)वि.वि.कामेश भोंडे(पुणे)[4] 11-8,11-5,11-3;
दिलीप कुडतरकर(पुणे)[3]वि.वि.गिरीश सावंत(मुंबई शहर) 8-11,11-5,14-12,11-5;
पिनाकिन संपत(मुंबई उपनगर)[2] वि.वि.दिलीप हुनरी 11-7,11-2,11-1;
उपांत्य फेरी:
सतीश कुलकर्णी(पुणे)[1] वि.वि.चंद्रकांत मैनकर(ठाणे) 11-8,11-5,11-4;
दिलीप कुडतरकर (पुणे) [3] वि.वि. पिनाकिन संपत (मुंबई उपनगर)[2] 14-12,15-13,7-11,6-11,11-9
अंतिम फेरी: सतीश कुलकर्णी (पुणे)[1] वि.वि.दिलीप कुडतरकर(पुणे)[3] 11-3,11-5,11-7

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share