Skip to content

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का! फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा दणदणीत विजय

Satara News : सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का! फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा दणदणीत विजय
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का! फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा दणदणीत विजय

Satara News : सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत त्यांनी भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ११ मतांनी पराभव केला. या निकालामुळे फलटणच्या सहकार क्षेत्रात भाजपला मोठा धक्का बसला असून महायुतीतील राजकीय समीकरणांचीही चर्चा रंगू लागली आहे.https://maharashtramirror.com/ Satara News

या अटीतटीच्या निवडणुकीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ७१ मते मिळाली, तर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ६० मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या ११ मतांच्या फरकाने संजीवराजे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी फलटणमध्ये गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.https://maharashtramirror.com/ Satara News

दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी नऊ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरित १२ जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात तब्बल ९७.९२ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली.

फलटणमधील निकालाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस अधिक वाढली आहे. विशेषतः भाजपच्या उमेदवाराचा झालेला पराभव आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मिळवलेला विजय यामुळे सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांवर कोणते परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उर्वरित जागांचे निकाल समोर आल्यानंतर सातारा जिल्हा बँकेतील सत्तेचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share