Pune News : देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवडमध्ये उभारणार!
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : रस्ते अपघातांना आळा घालण्यासह वाहनांची सुरक्षितता आणि चालकांचे कौशल्य वाढविण्यासाठी देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड (ता.
1 min read

Pune News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी; अत्याधुनिक सुविधांसह दर्जेदार उभारणीचे निर्देश
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : रस्ते अपघातांना आळा घालण्यासह वाहनांची सुरक्षितता आणि चालकांचे कौशल्य वाढविण्यासाठी देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.https://maharashtramirror.com/ Pune News
सासवड येथील २५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (ATS), स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (ADTT) आणि रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा समावेश आहे. स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रात सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे ब्रेक, सस्पेन्शन, दिवे आणि उत्सर्जनाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढून वेळेची बचत होणार आहे..https://maharashtramirror.com/ Pune News
स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गावर आठ आकडी मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि विविध वळणांच्या माध्यमातून चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिडिओ ॲनालिटिक्समुळे परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल.
या प्रशिक्षण संस्थेमार्फत मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
“रस्ते अपघात कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाचे उभारावे,” असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या केंद्रामुळे महाराष्ट्रातील रस्ता सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळ मिळणार असून, वाहनांची सुरक्षितता आणि चालकांच्या कौशल्यवृद्धीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


