Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
3 min read

Sant Tukaram Maharaj Palkhi sohla : ११ ते १७ जुलैदरम्यान विविध मार्गांमध्ये बदल; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
पुणे, महाराष्ट्र मिरर : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी देहू येथून प्रस्थान होणार असून पालखी ग्रामीण भागातून मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील भाविकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ११ ते १७ जुलैदरम्यान विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. (pune news sant tukaram maharaj palkhi sohla route traffic updates orders)
१२ जुलै – लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)
पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली–राहू–पारगाव–चौफुला मार्गाने वळविण्यात येतील. सोलापूरकडून पुण्याकडे येणारी वाहने चौफुला–राहू–केसनंद–वाघोली मार्गाचा वापर करतील. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
१३ जुलै – यवत ते वरवंड (वरवंड मुक्काम)
पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने हडपसर–मगरपट्टा–केसनंद–वाघोली–राहू–पारगाव–न्हावरे–काष्टी–दौंड–कुरकुंभ मार्गाने जातील. सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने कुरकुंभ–दौंड–काष्टी–न्हावरे–राहू–वाघोली मार्गाचा वापर करतील. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! जहांगीर चौक ते मंगलदास चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद
१४ जुलै – वरवंड ते उंडवडी (उंडवडी मुक्काम) (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
पुणे–सोलापूर वाहतूक चौफुला–पारगाव–न्हावरे–काष्टी–दौंड–कुरकुंभ मार्गाने वळविण्यात येईल. बारामती–पाटस आणि बारामती–दौंड मार्ग बंद राहतील. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे वळविण्यात येईल. पाटस–बारामती वाहने पाटस–चौफुला–सुपा–लोणीपाटी–बारामती मार्गाने जातील.
१५ जुलै – उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)
बारामती–पाटस आणि बारामती–दौंड मार्ग पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहतील. पर्यायी मार्ग म्हणून भिगवणमार्गे वाहतूक सुरू राहील. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
१६ जुलै – बारामती ते सणसर (सणसर मुक्काम)
जंक्शन–बारामती मार्ग बंद राहील. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहने जंक्शन–कळस मार्गे बारामतीकडे वळविण्यात येतील. बारामतीहून येणारी वाहने भिगवण–कळस मार्गे जंक्शनकडे जातील.
१७ जुलै – सणसर ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम)
१७ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १८ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत बारामती–इंदापूर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
नागरिकांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla )
अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याचे महापालिकेचे आदेश; मार्गावरील स्वच्छता व सुरक्षेवर भर
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात लवकरच आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि सुरक्षित व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने (पीएमसी) कंबर कसली आहे.
पालखी मार्गातील सर्व प्रकारची अतिक्रमणे, अनधिकृत जाहिरात फलक (बॅनर्स) आणि अनधिकृत स्वागत कमानी तातडीने हटवण्याचे कडक आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे आदेश देण्यात आले. या बैठकीत भाविकांची सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि त्यांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.
महापालिकेचे मुख्य नियोजन आणि उपाययोजना:
अतिक्रमण विरोधी मोहीम: पालखीच्या मुख्य मार्गांवर पादचाऱ्यांना आणि वाहनांना अडथळा ठरणारे अनधिकृत विक्रेते, तात्पुरते स्टॉल्स, बेकायदेशीर फलक आणि कमानी तातडीने निष्कासित केल्या जातील.
स्वच्छता व आरोग्य: पालखी मार्ग, वारकऱ्यांचे विसावा तळ आणि मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास कचरा व्यवस्थापन व स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
Mumbai Rain Update: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले!
मूलभूत सुविधा आणि निवास: लाखो भाविकांची सोय लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पुरेशा प्रमाणात फिरती शौशालये (मोबाईल टॉयलेट्स) आणि सुरक्षित निवास व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः मैदानावर उतरून या कामांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सुरक्षा किंवा स्वच्छतेच्या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


