Mumbai News : त्याचं रक्त भारतीय, आवाजही भारतीय!"; अभिनेता इम्रान खानच्या समर्थनार्थ संजय राऊत आक्रमक
Mumbai News :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान याला परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
1 min read

Mumbai News : आंदोलनात सहभाग घेतल्याने देश सोडण्याच्या नोटिशीवरून केंद्रावर निशाणा; अक्षय कुमारचा मुद्दा करत सरकारला धारेवर धरले
Mumbai News :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान याला परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईवरून आता राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. इम्रान खानचे रक्त आणि आवाज भारतीय असून, केवळ तरुणांच्या बाजूने बोलल्यामुळे आणि आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सरकार त्याच्यावर कारवाई करत असल्याचा संताप राऊतांनी व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
बॉलिवूडमधील इतर परदेशी कलाकारांचा मुद्दा करत केंद्र सरकारला सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले. "इम्रान खानने आंदोलनात सहभाग घेतला, तो तरुणांच्या बाजूने बोलला म्हणून त्याला देश सोडून जाण्यास सांगण्यात येत आहे, याचा अर्थ हे सरकार पुरतं घाबरलेलं आहे," असे राऊत म्हणाले. तसेच, बॉलिवूडमध्ये इतरही अनेक कलाकार आणि एनआरआय (NRI) परदेशी नागरिक आहेत, मग त्यांना असा नियम का लावला जात नाही? असा सवाल करत त्यांनी अभिनेता अक्षय कुमारचे उदाहरणही दिले. जे लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतात, त्यांनाच अशा कायदेशीर कारवाईचा बडगा दाखवून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इम्रान खानला मिळालेल्या या नोटीसीमुळे आणि त्यावर संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे इम्रान खानने या प्रशासकीय कारवाईविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, दुसरीकडे विरोधकांनी या मुद्यावरून केंद्र सरकारवर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंदोलनातील सहभाग आणि परदेशी नागरिकांच्या कायद्याचा हा वाद आगामी काळात आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.


