Skip to content

Mumbai news : एप्रिल-मे नंतर देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ : राऊत

Mumbai news :मुंबई, महाराष्ट्र मिरर : एप्रिल-मे महिन्यानंतर देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

एप्रिल-मे नंतर देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ : राऊत
एप्रिल-मे नंतर देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ : राऊत

Mumbai news :मुंबई, महाराष्ट्र मिरर : एप्रिल-मे महिन्यानंतर देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाशी सहमती दर्शवत, राजकीय बदलांची प्रक्रिया सुरू झाली असून, दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही उमटतील, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवरही भाष्य केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे रक्ताचे वारसदार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले होते. या विधानावरून राऊत यांनी शिंदे आणि भाजपवर टीका केली. “मोदी-शहांचा उदोउदो करणे हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का, हे आधी स्पष्ट केले पाहिजे,” असे राऊत म्हणाले. अमित शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून महाराष्ट्र व मुंबईचे नुकसान होत असल्याचा, मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचा आणि मुंबई वेगळी करण्याची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा भूमिकांना पाठिंबा देणे हा बाळासाहेबांचा विचार असू शकत नाही, असे सांगत त्यांनी संबंधितांवर टीका केली.
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैचारिक संघर्ष असला, तरी ते एकमेकांचे शत्रू नसतात, असे राऊत यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका मांडताना त्यांनी यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय परंपरेचा उल्लेख केला. मात्र, ठाकरे बंधू प्रत्यक्षात एकत्र येणार का, याबाबत त्यांनी कोणतीही ठोस घोषणा केली नाही.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share