Mumbai News : मुंबई ठाकऱ्यांचीच ; संजय राऊतांचा कृष्णराज महाडिकांना टोला
Mumbai News : मुंबई : पुणे दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यास सांगितल्याने राजकीय वादाला तोंड फुटले.
1 min read

Mumbai News : माहीममधील मनसे-भाजयुमो राड्यावरून राजकारण तापले; महाडिकांच्या आरोपांना राऊतांचे उत्तर
Mumbai News : मुंबई : पुणे दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यास सांगितल्याने राजकीय वादाला तोंड फुटले. या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने माहीममध्ये आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
भाजप युवा मोर्चाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची मोहीम आखण्यात आली होती. मात्र, भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचण्यापूर्वीच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थाबाहेर जमा झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि परिस्थिती चिघळल्याचे पाहायला मिळाले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
या घटनेनंतर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. शांततेत आंदोलन करण्यासाठी गेलो असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, काचेच्या बाटल्या फेकून कार्यकर्त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही महाडिक यांनी केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस! ही मुंबई आहे, ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकऱ्यांचीच आहे! बाकी सगळे येतात आणि जातात!” असा टोला लगावला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
संजय राऊत यांनी यासोबत एक मीमही शेअर केला असून त्यामध्ये भाजप युवा मोर्चाचा उल्लेख ‘खाजप युवा मोर्चा’ असा करत भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे माहीममधील राड्यानंतर आता शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले असून आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.


