Skip to content

Pune News : आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई

आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई

VK
Vikrant Kulkarni

1 min read

आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवा
आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवा

Pune News : सांगवी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Pune News : पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी कडक कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगवी पोलीस ठाण्याने समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे https://maharashtramirror.com/ Pune News

मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई: तीन वेगवेगळ्या टोळ्यांमधील एकूण २३ सराईत आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते सर्व सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.एम.पी.डी.ए. (MPDA) कायदयान्वये स्थानबद्धता: दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून एकाला हरसूल कारागृह (छत्रपती संभाजीनगर) व दुसऱ्याला कळंबा मध्यवर्ती कारागृह (कोल्हापूर) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

तडीपारीची कारवाई: महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये एकूण सात सराईत आरोपींना परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गुन्हेगारी कृत्य आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशी प्रतिबंधात्मक कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.https://maharashtramirror.com/

Share