Skip to content

Mumbai News: समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

Mumbai News : मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू
समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू

Mumbai News : मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. गॅन्ट्री उभारणीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बंद ठेवण्यास महामार्ग पोलिसांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) परवानगी दिली आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून वाहतूक नियोजन केले जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान सिन्नर-इगतपुरी मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद
• सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज: ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहणार आहे.
• भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज: ४ सप्टेंबर, ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
गॅन्ट्री उभारणीच्या कामासाठी हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून, वाहनचालकांनी नियोजित वेळेत प्रवासाचे नियोजन करावे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
समृद्धी महामार्गावरील दरोड्याची सरकारकडून गंभीर दखल
विशेष टास्क फोर्स स्थापन करून कठोर कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
समृद्धी महामार्गावर झालेल्या दरोड्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिस महासंचालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने विशेष टास्क फोर्स तयार करून या प्रकरणाचा तपास आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामार्गावर अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

Share