Mumbai News : सलमान खानभोवती सुरक्षेचे कडे आणखी कडक
Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असतानाच अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
1 min read

Mumbai News :टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सुरक्षा वाढवली; अत्याधुनिक MP5 SD6 सबमशीन गनसह कमांडो तैनात
Mumbai News :मुंबई, महाराष्ट्र मिरर : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असतानाच अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई गँगकडून असलेल्या कथित धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसोबत आता अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज कमांडोंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/Mumbai news
टायगर श्रॉफ हा हल्लेखोरांचा मूळ लक्ष्य नव्हता, तर एका मोठ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्याचा कट होता, असा दावा तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानला असलेल्या संभाव्य धोक्याबाबत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
सलमान खान यापूर्वीपासूनच कडेकोट सुरक्षेत आहे. मात्र, टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यात आणखी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या सुरक्षा व्यवस्थेत विशेष प्रशिक्षण घेतलेल्या आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज जवानांचा समावेश करण्यात आला आहे.
कमांडोंकडे MP5 SD6 सबमशीन गन
सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या कमांडोंकडे Heckler & Koch कंपनीची MP5 SD6 सबमशीन गन असल्याची माहिती आहे. ही गन 9×19 मिमी पॅराबेलम काडतुसांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. तिच्यातील इंटिग्रेटेड सप्रेसरमुळे गोळीबाराचा आवाज आणि मझल फ्लॅश कमी होण्यास मदत होते.
MP5 मालिकेतील शस्त्रांचा वापर जगभरातील विविध सुरक्षा आणि लष्करी दलांकडून केला जातो. सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा शस्त्रांनी सज्ज कमांडोंचा समावेश करण्यात आल्याने त्याच्याभोवतीचे सुरक्षा कवच आणखी मजबूत करण्यात आल्याचे दिसत आहे.
बिश्नोई गँगच्या कथित धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. आता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी अधिक खबरदारी घेत सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर आली


