Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघाताचा 'ब्लॅक बॉक्स' जळाला की दडवला? रोहित पवारांचा थेट नागरी उड्डाणमंत्र्यांवर घणाघात
Rohit Pawar On Black Box : "सुरक्षित असूनही जळाल्याचं का सांगितलं?"; अहवालातील गंभीर चुकांवरून घातपाताचा संशय अधिक गडद
1 min read

Rohit Pawar On Black Box : "सुरक्षित असूनही जळाल्याचं का सांगितलं?"; अहवालातील गंभीर चुकांवरून घातपाताचा संशय अधिक गडद
मुंबई :- 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राने लोकनेते अजित पवार यांना गमावले. या घटनेला दीड महिना उलटत असतानाच, आता या अपघाताचा तपास आणि त्याबाबतचा अहवाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी थेट केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांवर निशाणा साधत 'ब्लॅक बॉक्स'वरून खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तपासातील विसंगतींवर बोट ठेवले आहे.अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत. VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे.
घातपाताचा संशय?
विमान अपघाताच्या पहिल्या दिवसापासून रोहित पवार यांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अहवालातील तांत्रिक चुका आणि ब्लॅक बॉक्सबाबतची संदिग्ध माहिती यामुळे हा संशय आता अधिक गडद होत आहे. काँग्रेस आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीतील मित्रपक्ष हा विषय संसदेत आणि जाहीरपणे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


