Skip to content

निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीररीत्या वावर

PG
Prashik Ghaste

1 min read

निगडीत तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीररीत्या वावर

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार धारदार कोयत्यासह फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई रविवार (२४ मे) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली.

आयुब चमन खान (२८, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्‍हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस हवालदार जयवंत राऊत यांनी रविवारी (२४ मे) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुब खान याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही तो बेकायदेशीररीत्या शहरात फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share