Delhi Blast News: लाल किल्ल्याजवळील स्फोटामागे ‘अल-कायदा’चा हात
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा
2 min read

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा

Delhi crime News नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या स्फोटामागे ‘अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशी संबंधित निरीक्षण पथकाच्या अहवालात करण्यात आला आहे. लाल किल्ल्याजवळील वाहनात झालेल्या या स्फोटात अनेकांचा मृत्यू, तर २० हून अधिक जण जखमी झाले होते. भारतात या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करत असून, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामुळे या तपासाला आता आंतरराष्ट्रीय संदर्भ प्राप्त झाला आहे. Delhi blast news https://maharashtramirror.com/
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ निर्बंध समितीशी संबंधित निरीक्षण पथकाच्या अहवालानुसार, अल-कायदाच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे. विखुरलेल्या स्वरूपातील संघटनेचे रूपांतर आता विकेंद्रित नेटवर्कमध्ये झाले असून, विविध भागांत छोट्या-छोट्या सेलच्या माध्यमातून संघटना सक्रिय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. Delhai crime news
अहवालात अल-कायदाच्या अफगाणिस्तानातील उपस्थितीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेशी संबंधित दहशतवादी काबूलमध्ये वास्तव्यास असून अफगाण ओळखपत्रांचा वापर करून आपल्या हालचाली सुरू ठेवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय बांगलादेशमध्येही संघटनेकडून आपले नेटवर्क आणि कारवाया विस्तारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. Delhi blast news
अल-कायदाचे विकेंद्रित स्वरूप आणि छोट्या सेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या हालचाली या प्रादेशिक सुरक्षेसाठी चिंतेचा विषय असल्याचे निरीक्षण अहवालातून समोर आले आहे. Delhai crime news
रासायनिक, जैविक सामग्रीबाबतही इशारा
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात केवळ अल-कायदाच नव्हे, तर अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांकडून निर्माण होणाऱ्या व्यापक दहशतवादी धोक्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या संघटनांशी संबंधित घटकांकडून रासायनिक आणि जैविक सामग्री मिळविण्यात सातत्याने रस दाखवला जात असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना निधी उभारण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवण्यासाठी डिजिटल चलनाचा वापर करण्याचे मार्ग शोधत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे निर्बंध लागू असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित क्रिप्टोकरन्सी पत्त्यांचाही संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध व्यवस्थेत समावेश करण्याबाबत विचार करण्याची सूचना निरीक्षण पथकाने केली आहे. Delhai crime news
दिल्ली स्फोटाचा एनआयएकडून तपास
नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका वाहनात झालेल्या स्फोटाची भारतीय तपास यंत्रणांनी दहशतवादी घटना म्हणून चौकशी सुरू केली होती. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतला. भारतीय तपास यंत्रणांकडून या स्फोटामागे मोठे दहशतवादी नेटवर्क कार्यरत होते का, याचा शोध घेतला जात आहे. तपासात कट्टरतावादी विचारसरणीशी संबंधित व्यावसायिक व्यक्ती आणि अल-कायदाशी कथित संबंध असलेल्या संशयितांचा समावेश असलेल्या नेटवर्कची शक्यताही तपासण्यात येत असल्याचे वृत्त आहे. Delhai crime news


