Skip to content

Mumbai News : अमित ठाकरेंविरोधातील भाजयुमोच्या आंदोलनावर रवींद्र चव्हाण नाराज

Mumbai News मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याच्या घटनेनंतर भाजयुमोने केलेल्या आंदोलनावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

अमित ठाकरेंविरोधातील भाजयुमोच्या आंदोलनावर रवींद्र चव्हाण नाराज
अमित ठाकरेंविरोधातील भाजयुमोच्या आंदोलनावर रवींद्र चव्हाण नाराज

Mumbai News मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याच्या घटनेनंतर भाजयुमोने केलेल्या आंदोलनावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली आहे. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले.“काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण त्याच्या विरोधात आंदोलन करतो, हे चुकीचे आहे,” असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेमध्ये निर्माण झालेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

अमित ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी मुंबईतील माहिम परिसरात आंदोलन केले होते. यावेळी भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण चांगलेच तापले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “मला युवाशक्तीला अडचणीत आणायचे नाही. आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, त्यांना गुंड म्हणून तयार करायचे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या युवा मोर्चाला आंदोलन करताना संयम आणि पक्षाच्या धोरणाचा विचार करण्याचा स्पष्ट संदेश गेल्याचे मानले जात आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या भाजप-मनसे वादात आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share