Skip to content

Pune News : जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर झाल्याने रावेत येथे आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण

Pune News : पिंपरी: जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याची घटना घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर झाल्याने रावेत येथे आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण
जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर झाल्याने रावेत येथे आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण

Pune News : पिंपरी: जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी १२:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास रावेत येथील कन्नू की चाय रेस्टॉरंटजवळ ते विश्रांतवाडी दरम्यान घडली. https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणात सूरज नाथाजी पाटील (३१, रा. रावेत, मूळ - पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाकांत तिवारी (किवळे), मुस्सा गौस शेख (देहूरोड) आणि तिवारी यांचा कारचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी मुस्सा गौस शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

किवळे येथील जमीन विकसित करण्यासाठी आरोपी आणि जागा मालक यांच्यात डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचे काम फिर्यादीच्या मध्यस्थीने सुरू होते. ॲग्रीमेंट करण्यास विलंब होत असल्याने आरोपींनी फिर्यादीला रेस्टॉरंटजवळ बोलावून दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला टोयोटा हायरायडर कारमध्ये बळजबरीने बसवून मारहाण केली आणि त्यांच्याकडून एचडीएफसी बँकेच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. आरोपींनी फिर्यादीला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विश्रांतवाडी येथे सोडले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share