Skip to content

पीएमपीएमएलमध्ये नोकरीच्या आमिषाने बलात्कार

संशयिताने पिडीतेकडून ९० हजार रुपये देखील घेतले

PG
Prashik Ghaste

1 min read

पीएमपीएमएलमध्ये नोकरीच्या आमिषाने बलात्कार

संशयिताने पिडीतेकडून ९० हजार रुपये देखील घेतले

पिंपरी: पीएमपीएमएल मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने ३९ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बस चालक बालाजी सपाटे (वय ४३, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डांगे चौकातील एका लॉज मध्ये घडला आहे.

पीडित महिलेला सपाटे याने नोकरीचे आमिष दाखवले. तसेच तिच्याकडून ९० हजार रुपये देखील घेतले. त्यानंतर आरोपी महिलेने पीडित महिलेला घरात घुसून मारहाण करीत सपाटे विरोधात तक्रार देण्यापासून रोखले. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Share