Skip to content

Pune News : रणवीर सिंग जमतानीचा ब्रँड अँम्बेसेडर

Pune News : पुणे : पुण्यातील विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या जमतानीने आपल्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

रणवीर सिंग जमतानी’चा ब्रँड अॅम्बेसेडर
रणवीर सिंग जमतानी’चा ब्रँड अॅम्बेसेडर

Pune News : पुणे : पुण्यातील विश्वासार्ह रिअल इस्टेट ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या जमतानीने आपल्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘दिलेलं वचन म्हणजे ते पूर्ण करण्याची जबाबदारी’ या साध्या पण ठाम विचारावर जमतानीने आपली विश्वासार्हता उभी केली आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे, दर्जेदार बांधकाम, विश्वासार्हता आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी या मूल्यांमुळे जमतानीने गेल्या १६ वर्षांत हजारो घरमालकांचा विश्वास संपादन केला आहे. आता कंपनी आपल्या विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून, या नव्या प्रवासासाठी भारताचा लोकप्रिय आणि बहुआयामी अभिनेता रणवीर सिंग याची जमतानीच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही भागीदारी महत्त्वाकांक्षा, सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची वृत्ती आणि पारंपरिक चौकटी मोडून नवे काही करण्याच्या समान विचारांवर आधारित आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि स्वतःच्या मेहनतीने निर्माण केलेल्या यशस्वी प्रवासासाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग हा जमतानीच्या पुढील वाटचालीतील दृष्टिकोनाशी उत्तम प्रकारे जुळणारा चेहरा आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य पत्रकार परिषदेत या भागीदारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी जमतानीच्या आतापर्यंतच्या प्रवासासह ‘The Name is a Promise’ – ‘नाव म्हणजे एक वचन’ या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर रणवीर सिंगची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. या भागीदारीबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला,
“माझा नेहमीच असा विश्वास आहे की कोणतीही मजबूत भागीदारी ही समान मूल्ये आणि भविष्यासाठीच्या समान दृष्टिकोनातून निर्माण होते. जमतानीसोबतची ही भागीदारी माझ्यासाठी त्यामुळेच विशेष आहे. दर्जा आणि विश्वासाच्या जोरावर या ब्रँडने एक मजबूत वारसा निर्माण केला आहे आणि त्याच्या पुढील प्रवासाचा भाग होताना मला अभिमान वाटतो.”
जमतानीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप जमतानी म्हणाले,
“रणवीर सिंगला आमच्यासोबत जोडण्यामागे या भागीदारीतून जमतानीसाठी काय साध्य करायचे आहे, याबाबतचा ठाम विश्वास आहे. रणवीरची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची वृत्ती आणि सतत प्रगती करण्याची धडपड ही आमच्या नव्या पर्वाच्या भावनेशी खूप जवळची आहे. संपूर्ण जमतानी कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि पुढे अनेक नव्या संधी आमची वाट पाहत आहेत.”
जमतानीच्या कार्यकारी संचालिका मीनाक्षी जमतानी म्हणाल्या,

Share