Baramati News : बारामती विमानतळ परिसरात राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
Baramati News : बारामती : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
1 min read

Baramati News : बारामती : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.https://maharashtramirror.com/
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था दर्शवणारी ही घटना असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. बारामतीसारख्या महत्त्वाच्या शहरात, तेही विमानतळ परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रविवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राणा सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बारामतीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, भरवस्तीत आणि महत्त्वाच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


