Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे खारघर मध्ये भव्य स्वागत..
Ramdas Athawale Latest News : रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्याने नवी मुंबईत त्यांचे जल्लोषात स्वागत
1 min read

Ramdas Athawale Latest News : रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्याने नवी मुंबईत त्यांचे जल्लोषात स्वागत
पनवेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचे केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळवून पुन्हा एकदा त्यांच्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामदास आठवले दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर त्यांनी खारघर येथे एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या सोहळ्यात रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपद रामदास आठवले यांच्यावर यांना बहाल करण्यात आले आहे. रामदास आठवले यांच्यावर तिसऱ्यांदा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री पदाची जबाबदारी एनडीए सरकारमध्ये देण्यात आली आहे. रामदास आठवले हे राज्यसभेचे सदस्य असून यांना एनडीए सरकार मध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आली आहे. Ramdas Athawale Latest News
Photos · 1/3
Arrow Keys ⟵ ⟶
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या वतीने खारघर नगरीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.याप्रसंगी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदे चे राज्य सरचिटणीस ॲड. सुशील महाडिक, खारघर शहराध्यक्ष मल्हारी घाटविसावे आणि इतर सहकारी उपस्थित होते. Ramdas Athawale Latest News


