Skip to content

Pune News : रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Pune News : बहिणींनी भावांना बांधली प्रेमाची राखी


Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळाली. बहिणींनी भावांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, तर भावांनी बहिणींना भेटवस्तू देत त्यांच्या संरक्षणाची ग्वाही दिली https://maharashtramirror.com/ Pune News
परगावी असलेल्या भावंडांना भेटण्यासाठी अनेकांनी प्रवास केला. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच प्रमुख मार्गांवरही वर्दळ वाढली होती. अनेक कुटुंबांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दूर असलेल्या भावंडांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
शाळा आणि विविध संस्थांमध्येही रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Share