Skip to content

Pune News : पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याला दुहेरी मुकुटपुण्याच्या शरण्या पटवर्धन व वरदान कोलते यांना उपविजेतेपद

Pune News : पुणे /सांगली : सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याने दोन गटात विजेतेपद पटकावले आणि पाचव्या राज्यमानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याला दुहेरी मुकुटपुण्याच्या शरण्या पटवर्धन व वरदान कोलते यांना उपविजेतेपद
पाचवी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याला दुहेरी मुकुटपुण्याच्या शरण्या पटवर्धन व वरदान कोलते यांना उपविजेतेपद

Pune News : पुणे /सांगली : सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याने दोन गटात विजेतेपद पटकावले आणि पाचव्या राज्यमानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. पुण्याच्या शरण्या पटवर्धन व वरदान कोलते यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सूरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा कृष्णा व्हॅली स्कूल सांगली येथे आयोजित केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात राजवर्धन याने अंतिम लढतीत ठाण्याच्या अधिराज चौहान याच्यावर १५-१३,११-८,९-११,१२-१० अशी मात केली. पाठोपाठ त्याने तेरा वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या वरदान कोलते याला पराभूत केले मात्र हा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. वरदान याने त्याला चिवट लढत दिली अखेर राजवर्धन याने हा सामना ११-५,१४-१२,७-११,८-११,१२-१० असा जिंकला.

मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात रिद्धी सिंग (ठाणे) हिने पुण्याच्या शरण्या पटवर्धन हिला अंतिम लढतीत पराभूत केले. चुरशीने झालेला हा सामना तिने ५-११,११-७,११-७,१०-१२,१३-११ असा जिंकला. मुलींच्या तेरा वर्षाखालील गटात ठाण्याच्या रुहीका वाणी ही विजेतेपदाची मानकरी ठरली. तिने अंतिम लढतील तिची सहकारी जिनेया वधान हिला ७-११,११-८,११-७,११-४ असे पराभूत केले

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share