Skip to content

Mumbai News : 'MPSC आंदोलक विद्यार्थ्यांना दिलेला शब्द राज ठाकरेंनी पाळला; मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा, लवकरच मिळणार 'गुड न्यूज'!'

Mumbai News : मुंबई :- स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीचे प्रकरण आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

Raj Thackeray
Raj Thackeray

Mumbai News : 'पुण्यातील पेपर फुटीविरोधातील आंदोलनानंतर राज ठाकरेंची आक्रमक शिष्टाई; विद्यार्थ्यांना बाळगण्याचे आवाहन'

Mumbai News : मुंबई :- स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीचे प्रकरण आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यामध्ये MPSC च्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंत्री नितेश राणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भेट दिली. या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि त्यांच्या मागण्या सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; राज ठाकरेंची 'एक्स'वरून माहिती

राज ठाकरे यांनी MPSC विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांशी या विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक नक्कीच चांगली बातमी येईल," असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

राज ठाकरे यांची फेसबूक/एक्स पोस्ट जशीच्या तशी

सस्नेह जय महाराष्ट्र,
5 ऑक्टोबर 2026 ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.

स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.

म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
— राज ठाकरे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share