Skip to content

Delhi News : सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो’; राहुल गांधींचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi News :नवी दिल्ली : ‘सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो,’ असा मोठा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो’; राहुल गांधींचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो’; राहुल गांधींचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Delhi News :नवी दिल्ली : ‘सरकार कोसळणार, हे खात्रीने सांगतो,’ असा मोठा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी काँग्रेससह इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, दिल्लीत आज जंतरमंतर येथे सीजेपीच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच राहुल गांधी यांचा सरकार कोसळण्याबाबत दावा करणारा व्हिडिओ समोर आला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

‘भारतीय नागरिकांचा आवाज दाबता येणार नाही’; राहुल गांधींचा निवडणूक आयुक्तांना सवाल
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. भारतीय नागरिकांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सरकारच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला. ‘सरकार कोसळणार, हे मी खात्रीने सांगतो,’ असे ते म्हणाले. https://maharashtramirror.com/ Delhi News

निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधी यांनी लोकशाहीत जनतेचे स्थान सर्वोच्च असल्याचे अधोरेखित केले. ‘समजून घ्या, अंमलबजावणी करणारे आणि जनतेला सेवा देणारे हे काही राजे नाहीत. भारतीय नागरिकांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते स्वतःला समजतात तरी कोण? तुम्ही या देशाचा आवाज आहात. तुम्हाला भेटणार नाही, असे सांगणारे ते कोण?’ अशा शब्दांत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लक्ष्य केले.

SIR प्रक्रियेवरून काँग्रेस आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर आक्षेप घेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या मागण्यांसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखल्यानंतर खासदारांनी आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन केले. त्यानंतरही निदर्शने सुरू ठेवत विरोधकांनी आपला विरोध अधिक तीव्र केला.

राजघाटावर सत्याग्रह; ‘ग्यानू तो गियो’च्या घोषणांनी परिसर दणाणला
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात इंडिया आघाडीच्या खासदारांनी राजघाट येथे शांततापूर्ण सत्याग्रह केला. त्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये विरोधकांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत खासदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी ‘ग्यानू तो गियो’ अशा घोषणाही देण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले.

१९ पक्षांचा पाठिंबा; काँग्रेसकडून अनुपस्थित खासदारांनाही समज
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह इंडिया आघाडीतील १९ पक्षांचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आंदोलनाच्या काही टप्प्यांवर काही पक्षांचे खासदार अनुपस्थित असल्याचेही दिसून आले.

आंदोलनाला उपस्थित न राहिलेल्या काँग्रेस खासदारांबाबत पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर अधिकाधिक खासदार आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र दिसले.

निवडणूक आयोगासह भाजपवरही राहुल गांधींचे टीकास्त्र
SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपवरही निशाणा साधला आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवरून सुरू झालेला हा संघर्ष आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आला आहे.

दरम्यान, ‘सरकार कोसळणार’ या राहुल गांधी यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामागील राजकीय संदर्भ आणि त्यावर सत्ताधारी भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share