Skip to content

Mumbai News : सरकारने आवश्यक निर्णय घेतले; आता शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Mumbai news : मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलून निर्णय घेतले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सरकारने आवश्यक निर्णय घेतले; आता शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही’
सरकारने आवश्यक निर्णय घेतले; आता शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही’

Mumbai news : मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलून निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत जाणार नाही, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

सरकारने मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, या निर्णयांबाबत जरांगे पाटील समाधानी नसतील, तर तो त्यांचा निर्णय आहे, असे विखे-पाटील म्हणाले. सरकारने आपल्या परीने सर्व पर्यायांचा वापर केला असून आता जरांगे यांनीही सरकारची भूमिका समजून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी राज्यात १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरेही आयोजित करण्यात आली आहेत.https://maharashtramirror.com/ mumbai news

“सरकार एक पाऊल पुढे येत असेल, तर त्यांनीही समजून घेतले पाहिजे. आमच्याकडे जे पर्याय होते, ते सर्व करून झाले आहेत. या विषयात राजकारण आणायचे नाही, प्रश्न सुटला पाहिजे,” असे विखे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस असून, त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Share