Pune crime: दहीहंडीला परवानगी नसतानाही कार्यक्रम; नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा
Pune News पुणे : परवानगी नसताना दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यक्रम आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
1 min read

Pune News : अश्लील नृत्य टाळण्यासाठी प्रमाणपत्राची अट; पूर्तता न केल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली
Pune News पुणे : परवानगी नसताना दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटीलसह मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यक्रम आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी पोलिसांनी सहभागी कलाकारांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली होती. मात्र, संबंधित प्रमाणपत्र सादर न केल्याने पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका दहीहंडी कार्यक्रमात विविध कलाकारांच्या नृत्याचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मात्र, आयोजकांकडून या अटीची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी संबंधित दहीहंडी कार्यक्रमाला परवानगी दिली नव्हती. असे असतानाही पोलिसांची परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए. के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागर नगर, भाग १, कात्रज) आणि कार्यक्रमाचे आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या पद्धतीने करण्यात आले आणि पोलिसांची परवानगी नसतानाही कार्यक्रम कसा पार पडला, याबाबत माहिती घेतली जात आहे.


