Skip to content

पुणेकरांच्या तक्रारींचे आता जागेवरच निवारण

आज (ता.

PG
Prashik Ghaste

1 min read

पुणेकरांच्या तक्रारींचे आता जागेवरच निवारण

आज (ता. २५) विविध पोलीस ठाण्यांत 'तक्रार निवारण दिन’

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, येत्या शनिवारी (ता. २५) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या दिवशी संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त (DCP) आणि सहायक पोलीस आयुक्त (ACP) नेमून दिलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहणार आहेत. ज्या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसतील, तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तक्रार निवारणाची प्रक्रिया पूर्ण करतील. नागरिकांचे अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत आणि त्यांना न्याय मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

येत्या शनिवारी (२५ एप्रिल) अधिकारी खालील ठिकाणी उपलब्ध असतील:
पोलीस उपायुक्त (DCP): फरासखाना, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, बंडगार्डन, हडपसर, वाघोली, लोहेगाव (विशेष शाखा), विश्रांतवाडी (वाहतूक), नऱ्हे (मुख्यालय), गुन्हे शाखा आणि आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.

सहायक पोलीस आयुक्त (ACP): समर्थ, डेक्कन, स्वारगेट, मार्केट यार्ड, कोथरुड, सिंहगड रोड, चतु:शृंगी, लक्ष्मीनगर, वानवडी, कोरेगाव पार्क, काळेपडळ, मांजरी, लोणीकंद, विमानतळ आणि लष्कर.

पुणे पोलीस दलाने आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांचे पोलीस ठाण्यातील तक्रार अर्ज प्रलंबित आहेत किंवा ज्यांना काही समस्या मांडायच्या आहेत, त्यांनी शनिवारी विहित वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींवर चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Punekars' complaints will now be redressed on the spot.

Share