Pune Crime: पुणे विद्यापीठ चौकाजवळ भरधाव बसच्या धडकेत सायकलस्वार तरुणाचा मृत्यू
पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकाजवळ शनिवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला.
1 min read

Pune Crime: चतुःश्रृंगी पोलिसांत पीएमपीएमएल बसचालकाविरुद्ध गुन्हा

पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकाजवळ शनिवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अतिशय निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगात चालवलेल्या एका पीएमपीएमएल बसने सायकलवरून जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात पीएमपीएमएल बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
मिळालेल्या माहितीनुसार, रेहान इक्राम अन्सारी (वय १९) आणि त्याचा मित्र सोहेल नूर अन्सारी (वय २१) (दोघेही रा. जनवाडी) हे दोघे शनिवारी (२९ ऑगस्ट) सकाळी ९:५० वाजेच्या सुमारास सायकलवरून गणेशखिंड रस्त्याने जात होते. ते मेरीडीयन प्लाझा इमारतीसमोर, पुणे विद्यापीठ चौकाजवळ आले असता, पुणे स्टेशन डेपोची पीएमपीएमएल बस भरधाव वेगात आली. बसचा चालक वैभव चंद्रकांत चौगुले याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बस निष्काळजीपणे चालवून सायकलस्वारांना पाठीमागून जबर धडक दिली. या भीषण धडकेत सोहेल अन्सारी हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रेहान अन्सारी हा जखमी झाला.https://maharashtramirror.com/ Pune crime
या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी रेहान अन्सारी याने दिलेल्या तक्रारीवरून बसचालक वैभव चंद्रकांत चौगुले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime


