Skip to content

Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : उंड्री परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune News : मारहाण करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : उंड्री परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पतीविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी प्लंबिंग पाईपने पत्नीच्या चेहऱ्यावर, कानावर आणि डोक्यावर मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ८५, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३२४(४), तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७, ६७(अ) आणि ६६(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ऑक्टोबर २०२४ पासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. उंड्री येथील सिग्नेचर कूल होम, येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मानसिक त्रास देत होता. शिवीगाळ करून लोखंडी प्लंबिंग पाईपने मारहाण केल्याने ती जखमी झाली. तसेच तिचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share