Pune News : वाहतूक व्यवस्थेत तातडीचे बदल करणार : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली.
1 min read

पुणे वाहतूक कोंडीवर उपायांसाठी स्वतंत्र सल्लागार समित्या

पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. विविध क्षेत्रांतील मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. पुणे शहराला विविध मार्गांनी वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विविध वाहतूक समस्या आणि कोंडीची ठिकाणे लक्षात घेऊन स्वतंत्र सल्लागार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांकडून संबंधित भागातील वाहतूक समस्या, नागरिकांच्या तक्रारी आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास केला जाणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune news
येत्या १५ दिवसांत वाहतूक व्यवस्थेत कोणते तातडीचे बदल करता येतील, यावर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानंतर या उपाययोजनांच्या परिणामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.दरम्यान, वाहनांवरील फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई कंट्रोल रूमच्या माध्यमातूनही सुरू राहणार असून, स्थानिक पोलीस आणि वाहतूक शाखेकडून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. Pune News https://maharashtramirror.com/https
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत असल्याने, पुणे महापालिकेकडे पाठपुरावा करून खड्डे तातडीने दुरुस्त करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या वाहतूकविषयक तक्रारींचीही नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


