Skip to content

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक: महायुतीत अंतर्गत चुरस वाढली; अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

Pune News :पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीकडून भाजपने कौस्तुभ गावडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक: महायुतीत अंतर्गत चुरस वाढली; अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक: महायुतीत अंतर्गत चुरस वाढली; अपक्ष उमेदवार सचिन सानपांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

Pune News :पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुतीकडून भाजपने कौस्तुभ गावडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तत्पूर्वी, शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेले मंगेश चिवटे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. मात्र आता, गावडे यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून अंतर्गत बळ मिळत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी विधान परिषद निवडणुकीबाबत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत खलबतं झाली. विशेष म्हणजे, या गुप्त बैठकीला महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार सचिन सानप हे देखील उपस्थित होते.
सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांचे एसडीओ राहिले आहेत. साम टीव्हीच्या वृत्तानुसार, या बैठकीत प्रामुख्याने सचिन सानप यांच्या उमेदवारीवर आणि भूमिकेवर सखोल चर्चा झाली. राजकीय वर्तुळात या बैठकीत सचिन सानप यांच्या विजयाची रणनीती आखण्यात आल्याची आणि त्या अनुषंगाने तयारी सुरू असल्याची चर्चाना उधाण आले आहे.
एका बाजूला महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवाराला अशा प्रकारे वरिष्ठ नेत्यांच्या भेटीत सामावून घेतल्यामुळे महायुतीत सर्वकाही आटोक्यात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना ‘युती धर्म पाळावा’, असे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती समोर येत असून यामुळे आगामी निवडणुकीत रंगत वाढली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share