Pune Spa Raid : पुण्यातील उच्चभ्रू कल्याणी नगर भागात स्पा सेंटरवर छापा; एकाला अटक, दोन महिलांची सुटका
पुणे, ३ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Maharashtra Mirror
1 min read

पुणे, ३ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Maharashtra Mirror
Pune Spa raid Kalyani nagar : पुण्यातील कल्याणी नगर या उच्चभ्रू भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना बळजबरीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांना 'निरा स्पा सेंटर'मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला तिथे पाठवले आणि सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.
अटकेतील आरोपी आणि कायदेशीर कारवाई
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव अरमान रहिमुद्दीन हुसेन (वय २१, रा. विमान नगर) असे आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १४३(१)(३), ३(५) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय ठाकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या सूचनेनुसार खालील पथकाने सहभाग घेतला:
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, मोनिका पवार, दिव्या मोरे, सपना म्याना आणि सुवर्णा साळोखे.


