Pune Crime : सिंहगड रोडवरील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
1 min read

Pune Crime : गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणे आणि घरात घुसून मारहाणीचे गुन्हे
Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. प्रथमेश उर्फ जयेश पंकज देसाई (वय २१, रा. नऱ्हे, पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून त्याला हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश देसाई याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, अग्निशस्त्र बाळगणे आणि घरात घुसून मारहाण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार सर्व्हेलन्स पथकाने पुढील कार्यवाही केली.पोलीस उपनिरीक्षक मुपेश साळुंके यांच्यासह पोलीस अंमलदार पंकज देशमुख, अरविंद धावडे आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी त्रिभुवन यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर तडीपार आदेश क्रमांक २१/२०२६, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ अन्वये प्रथमेश देसाई याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.


