Skip to content

Pune Crime: शेअर मार्केटमधील जादा परताव्याच्या अमिषाने एकाची चौदा लाखांची फसवणूक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर भामट्यांनी धायरी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईनद्वारे तब्बल १४ लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

शेअर मार्केटमधील जादा परताव्याच्या अमिषाने एकाची चौदा लाखांची फसवणूक नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शेअर मार्केटमधील जादा परताव्याच्या अमिषाने एकाची चौदा लाखांची फसवणूक नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून सायबर भामट्यांनी धायरी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईनद्वारे तब्बल १४ लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदारांशी सायबर भामट्यांनी २६ नोव्हेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून व फोनद्वारे वारंवार संपर्क साधला. आरोपींनी स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचे भासवून, त्यांच्या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास अत्यंत कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल असे अमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी तक्रारदारांना विविध ऑफर्स दाखवल्या. https://maharashtramirror.com/ Pune News
तक्रारदारांचा विश्वास बसल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. जास्तीच्या नफ्याच्या आशेने फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण १४ लाख ३३ हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे गुंतवल्यानंतर कोणताही परतावा मिळाला नाही आणि स्वतःची मुद्दल रक्कमही परत काढता येत नसल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे उमगले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत अधिक तपास करत आहेत.

Share