Skip to content

Pune News : सारसबाग परिसरात उभ्या कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

Pune News :पुणे: सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये २५ ते ३० वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सारसबाग परिसरात उभ्या कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह
सारसबाग परिसरात उभ्या कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

Pune News : दुर्गंधी येऊ लागल्याने प्रकार उघडकीस; फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

Pune News :पुणे: सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये २५ ते ३० वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुण लोणी काळभोर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune news

नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक कार काही काळापासून उभी होती. गुरुवारी कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने जवळच असलेल्या मंदिरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. ठसेतज्ज्ञ व न्यायवैद्यक पथकाकडून वाहनाची व परिसराची पाहणी केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


"एका बंद कारमध्ये पुरुषाचा मृतदेह सापडला असून त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून सध्या तपास सुरू आहे. ही कार तेथे नक्की किती वेळेपासून उभी होती, हे तपासले जात आहे. मंदिरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती लोणी काळभोर येथील रहिवासी होती." — यशवंत निकम, पोलीस निरीक्षक

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share