Skip to content

Pune News : सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पायी निघालेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर परिसरात घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले सहकारनगर पोलिसांत दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा
सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले सहकारनगर पोलिसांत दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा

Pune News : सहकारनगर पोलिसांत दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पायी निघालेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर परिसरात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे https://maharashtramirror.com/ pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास महिला रणजीत हाईट्सजवळील रस्त्यावरून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या समोरून जवळ आल्या. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अचानक हिसकावले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर महिलेने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली. दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नसून सहायक पोलिस निरीक्षक संघर्षी पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share