Pune Crime : पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; विविध गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना घेतले ताब्यात
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: पुणे जिल्हा ग्रामणी पोलिस दलाच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली आहे.
2 min read

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: पुणे जिल्हा ग्रामणी पोलिस दलाच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
चिमुकलीचे अपहरण करून विहिरीत ढकलले
चिमुकलीचे अपहरण करून विहिरीत ढकलल्याची घटना दौंड तालुक्यातील मौजे नानगाव येथे सोमवारी (दि. ३१) घडली. पाच वर्षे दहा महिने वयाच्या मुलीला अमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान आरोपी कालूसिंग रायसिंग वसावे (वय १९, रा. नंदुरबार) याने बालिकेला विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime
एक लाखाचा गांजा जप्त
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चास-नारोडी मार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या संपत गणपत शिंदे (वय ४३, रा. चास) याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून १ किलो ७७० ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख १,६०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
मुदतबाह्य औषधे उघड्यावर टाकल्याने गुन्हा दाखल
मोरगाव येथे रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत अलसोल सिरपच्या तीन हजार बाटल्या आणि दोन लाख ७६ हजार रूपये किमतीचे पिल्सोल कॅप्सूलचे सहा हजार बॉक्स उघड्यावर टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. मुदतबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट न लावता ती सार्वजनिक ठिकाणी टाकल्याने मानवी आरोग्यास धोका आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात शशांक सदाशिव वाघ याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विविध ठिकाणी घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे (ता. इंदापूर) येथे बंद घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि एक दुचाकी असा एकूण दोन लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
भोर तालुक्यातील भेलकेवाडी येथील ‘स्वामी समर्थ सदन’ या घराचे कुलूप तोडून चोरट्याने एक लाख २२ हजार रूपये किमतीचे सोनेचांदीचे दागिने, मोबाईल आणि रोकड पळवून नेली. याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
मंचर येथील सोपानबाग सोसायटीमधील एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील १ लाख ३३ हजार ६५९ रूपये किमतीचे मोबाईल ॲक्सेसरीज साहित्य चोरीस गेले आहे. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
किरकोळ वादातून मारहाण आणि दुखापत
दौंड तालुक्यातील केडगाव, शिरूर तालुक्यातील सणसवाडी आणि आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे जुन्या आणि किरकोळ कारणांवरून जमाव जमवून दगड, लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण करून दुखापत केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी यवत, शिक्रापूर व पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


