Skip to content

Pune News : कुटुंबाला एकत्र आणण्याचे मॅरेथॉन माध्यम; महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रतिपादन

Pune News : पुणे : मॅरेथॉन हा चांगला उत्सव आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

कुटुंबाला एकत्र आणण्याचे मॅरेथॉन माध्यम : महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रतिपादन
कुटुंबाला एकत्र आणण्याचे मॅरेथॉन माध्यम : महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रतिपादन

Pune News : पुणे : मॅरेथॉन हा चांगला उत्सव आहे. कुटुंबाला एकत्र आणण्याचे माध्यम आहे. कुटुंबाला ही मोठे व्यासपीठ मिळणार असून कुटुंबासह पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने पुणे रन मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगो आणि नोंदणी पोर्टल अनावरण सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त नवल किशोर राम, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते निलेश निकम, गटनेते काका चव्हाण, गटनेते नितीन गावडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुमंत वाईकर यांचा सन्मान करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News

महापौर म्हणाल्या, समाज हितासाठी कोण विरोध करीत आहे हे ओळखणे गरजेचे आहे. त्यामुळे कामांना उशीर होत असतो. कामाबाबत जे रिल्स आम्हाला येतात त्यातून आमच्याकडून करून घेत असतात. पत्रकारांमुळे आम्हाला व्हिजन मिळत असते. काम करताना आम्हाला पत्रकारांची नेहमीच मदत होत असते. श्रमिक हा शब्द श्रम पासून श्रमाची पुजाच होत असते. राम म्हणाले, आचारसंहिता बाबत भीती कमी करावी. कामे ठप्प होणार नाही. श्रमिक हा महत्त्वाचा घटक असून मोठा आहे. पत्रकारांचे काम ऐतिहासिक आहे. पुण्यासाठी सुदृढ धाव गरजेची असून समर्पक नाव दिले आहे. आताच्या काळासाठी पुण्याला याची गरज आहे. नियोजन आणि प्रगती यामध्ये फरक पडत असतो. पुण्याचे लोक जागरूक झाले आहेत ही चांगली गोष्ट आहे. पुणेकरांनी शहरात सुधारणा करण्यासाठी सकारात्मक होण्याची गरज आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात समनव्य आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पत्रकारितेचे धोरण बदलणे गरजेचे नाही. कारण लोकशाही जिंवत ठेवण्याचे काम पत्रकारांनीच केले आहे. सूत्रसंचालन उद्धव धुमाळे, प्रास्ताविक उमेश शेळके यांनी तर हिरा सरवदे यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share