Skip to content

Pune News : नवरात्रोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती

Pune News : पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीपर संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

नवरात्रोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती
नवरात्रोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती

Pune News : पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीपर संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.https://maharashtramirror.com/ Pune News
नवरात्रोत्सवातील नऊ रंग, देवीची नऊ रूपे आणि सणातील विविध धार्मिक परंपरांचा संदर्भ देत महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काव्यात्मक पद्धतीने रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचे महत्त्व, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी सादर करण्यात आलेल्या संदेशातून सण-उत्सव साजरे करताना स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

रस्ता सुरक्षा जनजागृतीपर संदेश :


नवरात्रीची झाली सुरुवात,रस्ता सुरक्षेची करूया बात!
नवरात्रीला लावूया अखंड दिवा,सुरक्षित प्रवासाचा जप मनी ठेवा!
नऊ देवींची नऊ रूपे, नियम पाळल्यास जीवन होईल सोपे!
नऊ रंगांच्या नऊ साड्या, वेग नियंत्रणात ठेवूया सर्वच गाड्या!
यज्ञ, धूप, दीप, पूजापाठ आणि अभंग,मिटवून टाकू अपघातांचा रंग!
फुलांच्या हारासोबतच भरूया ओटी, हेल्मेट आणि सीटबेल्ट आहेत आपल्याच रक्षणासाठी!
या उपक्रमात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती स्नेहल माटे, श्रीमती सुकन्या मुंडे, मोटार वाहन निरीक्षक श्रीमती स्मिता कोले, श्रीमती तृप्ती पाटील, श्रीमती अश्विनी जाधव, श्रीमती अमृता भालशंकर, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती श्वेता सिंग, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कार्यालयातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share