Pune News : दुचाकींसाठी नवीन 'MH 61 G' मालिका सुरूआकर्षक क्रमांकांसाठी ८ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
Pune News : पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी 'MH 61 G' (उदा.
1 min read

Pune News : पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी 'MH 61 G' (उदा. MH61G0001) ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू केली जात आहे. या मालिकेतील पसंतीचे व आकर्षक नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांसाठी लिलाव व अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
चारचाकी वाहनांसाठी (तिप्पट शुल्कासह): ज्या चारचाकी वाहनधारकांना या नवीन दुचाकी मालिकेतून तीनपट शुल्क भरून व्हीआयपी नंबर हवा आहे, त्यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीचच्या दरम्यान आरटीओच्या खाजगी वाहन विभागात अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सव्वा तीन वाजे पर्यंत लिलावाचे डीडी स्वीकारले जातील आणि दुपारी चार वाजता सभागृहात लिलाव होईल.https://maharashtramirror.com/ Pune News
दुचाकी वाहनांसाठी: दुचाकींसाठी पसंती क्रमांक हवे असणाऱ्यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी अडीचच्या दरम्यान अर्ज जमा करावेत. लिलाव असल्यास १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत लिलावाचा डीडी स्वीकारून दुपारी चार वाजता सहकार सभागृहात लिलाव प्रक्रिया पार पडेल.
महत्त्वाच्या अटी व नियम:
• डीडीचे नियम: डीडी राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा "R.T.O., Pune" या नावानेच असावा (दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा). "Pune R.T.O." नावाचे वा चुकीच्या रक्कमेचे डीडी बाद ठरवले जातील.
• कागदपत्रे: अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्डची साक्षांकित प्रत व अचूक मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य आहे.
• पात्रता: पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असणाऱ्या वाहनधारकांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील. एका क्रमांकासाठी एका अर्जदाराने एकापेक्षा जास्त सीलबंद पाकिटे टाकल्यास अर्ज रद्द होईल.
• इतर: लिलाव पूर्ण झाल्यानंतर उर्वरित क्रमांक https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध होतील. ज्या अर्जदारांना लिलावात क्रमांक मिळाला नाही, त्यांनी ७ दिवसांच्या आत आपला मूळ डीडी परत घेऊन जावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.


