Skip to content

Pune News : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय: प्रलंबित ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अतिरिक्त शिबिरे आणि अपॉइंटमेंट्स जाहीर

Pune News :पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनचालकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय: प्रलंबित ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अतिरिक्त शिबिरे आणि अपॉइंटमेंट्स जाहीर
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय: प्रलंबित ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अतिरिक्त शिबिरे आणि अपॉइंटमेंट्स जाहीर

Pune News :पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनचालकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अनेक अर्जदारांच्या शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्नर लायसन्स) वैधता संपत आल्यामुळे आणि पक्क्या अनुज्ञप्तीसाठी (परमनंट लायसन्स) स्लॉट मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे पुणे आरटीओने मोठा दिलासा दिला आहे. जेजुरी येथे विशेष अतिरिक्त शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध ठिकाणी अतिरिक्त अपॉइंटमेंट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांच्या शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपत आहे, अशा अर्जदारांसाठी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जेजुरी येथे विशेष शिबीर दौरा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, वेल्हा, उरुळी कांचन, शिक्रापूर, पिरंगुट, शिरूर, जेजुरी आणि सासवड यापूर्वीच्या नियोजित शिबीर ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात प्रत्येकी २०० अपॉइंटमेंट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या अतिरिक्त अपॉइंटमेंट्स दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन किंवा ठरलेल्या प्रक्रियेनुसार उपलब्ध होतील. ज्या नागरिकांचे ड्रायव्हिंग लायसन्स प्रलंबित आहेत किंवा ज्यांच्या शिकाऊ परवान्याची मुदत संपत चालली आहे, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या पक्क्या परवान्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्या वतीने जनहितास्तव करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share