Skip to content

Pune News : कर्वेनगर येथे कॅलीब्रेशन झालेल्या ऑटोरिक्षांची १२ सप्टेंबरला होणार मीटर तपासणी; आरटीओ पुणेचे आवाहन

Pune News पुणे: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी मंजूर करण्यात आलेली नवीन भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

कर्वेनगर येथे कॅलीब्रेशन झालेल्या ऑटोरिक्षांची १२ सप्टेंबरला होणार मीटर तपासणी; आरटीओ पुणेचे आवाहन
कर्वेनगर येथे कॅलीब्रेशन झालेल्या ऑटोरिक्षांची १२ सप्टेंबरला होणार मीटर तपासणी; आरटीओ पुणेचे आवाहन

Pune News पुणे: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी मंजूर करण्यात आलेली नवीन भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या ऑटोरिक्षांचे मीटर कॅलीब्रेशन (दर संपादन) पूर्ण झाले आहे, अशा रिक्षांची मीटर तपासणी मोहीम आरटीओ कार्यालयाकडून आयोजित करण्यात आली आहे. ही तपासणी सुविधा शनिवारी (दि.१२) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर, पुणे येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षा चालकांनी आपल्या कॅलीब्रेशन झालेल्या मीटरची वेळेत तपासणी करून घ्यावी. नागरिकांच्या सोयीसाठी आणि नवीन नियमांनुसार अचूक भाडेआकारणी व्हावी या हेतूने ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित ऑटोरिक्षा चालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (विंदा गुरावे) यांनी केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
हा व्हिडिओ कर्वेनगर येथील आरटीओ रिक्षा मीटर तपासणी आणि पासिंग ट्रॅकची प्रत्यक्ष माहिती देतो, ज्यामुळे ही सुविधा कशी कार्य करते हे समजणे सोपे होते.

Share