Skip to content

Pune News : इतर राज्यांतील वाहनांवर 'आरटीओ' पुणेची धडक कारवाई; नियमबाह्य वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम चालू

Pune News : पुणे: दुसऱ्या राज्यात नोंदणीकृत असलेली परंतु महाराष्ट्र राज्यात नियमितपणे वापरली जाणारी खासगी वाहने आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे यांच्या रडारवर आली आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

: इतर राज्यांतील वाहनांवर 'आरटीओ' पुणेची धडक कारवाई; नियमबाह्य वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम चालू
: इतर राज्यांतील वाहनांवर 'आरटीओ' पुणेची धडक कारवाई; नियमबाह्य वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम चालू

Pune News : पुणे:दुसऱ्या राज्यात नोंदणीकृत असलेली परंतु महाराष्ट्र राज्यात नियमितपणे वापरली जाणारी खासगी वाहने आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे यांच्या रडारवर आली आहेत. अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून ५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ४७ नुसार, इतर राज्यात नोंदणीकृत झालेले वाहन दुसऱ्या राज्यात एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरल्यास, त्याची संबंधित राज्यात पुनर्नोंदणी (Re-registration) करून नियमानुसार वाहन कर भरणे बंधनकारक आहे.

या मोहिमेअंतर्गत ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पुणे शहर व परिसरात धडक तपासणी करण्यात आली. या कालावधीत १३४ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३७ वाहने दोषी आढळली आहेत. या कारवाईत ३ वाहने जप्त (अटकावून) करण्यात आली असून, दोषी वाहनधारकांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरिकांनी व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी, कर भरल्याची पावती तसेच इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. तसेच तपासणीदरम्यान परिवहन विभागाच्या पथकाला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share