Pune News : प्रवासी रिक्षा व दुचाकींवरून अनधिकृत मालवाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई - आरटीओ पुणे कडून इशारा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरामध्ये प्रवासी ऑटोरिक्षा आणि खाजगी दुचाकी वाहनांचा वापर अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
1 min read


Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरामध्ये प्रवासी ऑटोरिक्षा आणि खाजगी दुचाकी वाहनांचा वापर अनधिकृतपणे मालवाहतुकीसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, अशा वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांचे वैयक्तिक सामान वाहून नेण्यास मुभा आहे; मात्र व्यावसायिक स्वरूपाची मालवाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच, दुचाकी वाहनावरून वैयक्तिक सामान नेताना ते वाहनाच्या बाहेर येणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. दुचाकींचा व्यावसायिक मालवाहू वाहन म्हणून वापर करण्यास कायद्याने परवानगी नाही. https://maharashtramirror.com/ Pune News
यापूर्वी १६ जुलै २०२६ रोजी वृत्तनिवेदनाद्वारे ऑटोरिक्षा चालकांना सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही अशी वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मोटर वाहन कायद्यातील कलम ६६/१९२ नुसार प्रवासी परवाना असलेल्या वाहनातून बेकायदेशीर मालवाहतूक केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
त्यामुळे सर्व ऑटोरिक्षा व दुचाकी चालकांनी मालवाहतूक करणाऱ्या कोणत्याही अॅपवर ऑनबोर्ड (नोंदणीकृत) होऊ नये आणि आपल्या वाहनातून मालवाहतूक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओच्या वायुवेग पथकांना विशेष आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.


