Skip to content

Pune News : रविवार पेठेतील सव्वादोन कोटींच्या सोने चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा

Pune News :पुणे: पुण्यातील रविवार पेठ परिसरातून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि बिस्किटांची चोरी करणाऱ्या सराईत चोरांना खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

रविवार पेठेतील सव्वादोन कोटींच्या सोने चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा
रविवार पेठेतील सव्वादोन कोटींच्या सोने चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा

Pune News :काका-पुतण्या जेरबंद, शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

Pune News :पुणे: पुण्यातील रविवार पेठ परिसरातून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि बिस्किटांची चोरी करणाऱ्या सराईत चोरांना खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेल्या मुद्दामीलापेक्षाही अधिक, म्हणजेच एकूण २ कोटी २४ लाख ८६२ रुपये किमतीचे सोने हस्तगत करून १०० टक्क्यांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्हे निरीक्षक शर्मिला सुतार व तपास पथकाने ही कारवाई केली.

रविवार पेठेत राहणारे फिर्यादी मोहम्मद तौफीक रज्जाक खान (वय ३६) हे सुवर्णकार असून विविध सोनार त्यांना दागिन्यांच्या निर्मितीसाठी सोने देत असतात. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते सव्वाआठच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी घराबाहेर असताना अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले २ किलो २०० ग्रॅम वजनाचे, तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व बिस्किटे लांबवली. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासादरम्यान खडक पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. या वेळी फिर्यादी राहत असलेल्या इमारतीच्या खाली दोन संशयित इसम घुटमळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गोपनीय माहिती गोळा केली असता, ते दोघे त्याच बिल्डिंगमध्ये राहत असल्याचे आणि आपापसात काका-पुतणे असल्याचे समोर आले.

मुस्तफा नजीर शेख (वय ३६, रा. रविवार पेठ) आणि सरफराज उर्फ आवेज मैन्नुद्दीन शेख (वय २२, रा. रविवार पेठ) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींना ११ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या या कौशल्यामुळे चोराने नेलेला संपूर्ण मुद्देमाल तर मिळालाच, शिवाय अतिरिक्त ४६ ग्रॅम सोने मिळून एकूण २ किलो २४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात यश आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share