Skip to content

Pune Police News : पुणे पोलिस आयुक्तालयात बदल्यांचे सत्र; काळेपडळ, फरासखाना, कोथरुडसह अनेक ठाण्यांमध्ये फेरबदल

पुणे , महाराष्ट्र मिरर : Pune Police News

M
Mubarak

1 min read

Pune Police News : पुणे पोलिस आयुक्तालयात बदल्यांचे सत्र; काळेपडळ, फरासखाना, कोथरुडसह अनेक ठाण्यांमध्ये फेरबदल

पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune Police News

पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे फरासखाना, कोथरुड, काळेपडळ, डेक्कन, लष्कर, कोंढवा, वानवडी आणि विश्रांतवाडी यांसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन नेतृत्वाची नियुक्ती होणार आहे.

पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आदेशानुसार, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले निरीक्षक रुणाल सुजाउद्दीन मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली झाली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरुण घोडके यांच्याकडे कोथरुड पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील राजेंद्र भाऊराव पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

लष्कर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची कोंढवा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. गुन्हे शाखेतील निरीक्षक पंडीत रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात, तर युवराज हांडे यांची लष्कर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील संजय करनूर यांची न्हे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून लष्कर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील प्रदीप पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात नव्या दृष्टीकोनातून गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share