Pune Police :आरोपींची बोनेटवरून धिंड काढणे पोलिसांना भोवले
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

Pune Police : वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील तडकाफडकी तडकाफडकी तडकाफडकी बदली
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune police : जुलै महिन्यातील एका खूनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांच्या शासकीय वाहनाच्या बोनेटवर बसवून परिसरातून धिंड काढणे आणि त्यांना अमानुष वागणूक देणे भारती विद्यापीठ पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकाराची राज्य मानवाधिकार आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतल्यानंतर पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग संभाजी पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक सुरेश (सुदाम) गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. Pune Police mansingh patil transfer

नेमकी घटना काय?
जुलै महिन्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, तपासादरम्यान कायद्याची चौकट ओलांडत पोलिसांनी संशयित आरोपींना शासकीय वाहनाच्या बोनेटवर बसवून व काही जणांना गुडघ्यावर चालण्यास भाग पाडून परिसरातून त्यांची धिंड काढली. एवढेच नव्हे तर, याच दरम्यान मृताच्या संतापलेल्या नातेवाईकांकडूनही आरोपींना मारहाण झाल्याचे प्रकार समोर आले होते. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
Traffic : १५ दिवसांत सिंहगड रस्ता परिसराचा वाहतूक सर्वेक्षण अहवाल द्या

दरम्यान, पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कार्यपद्धतीची आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाची राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून गंभीर दखल घेतली. आयोगाने याप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त (DCP) आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना अधिकृत नोटीस बजावली. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल येत्या २० ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
Pune : धानोरीतील पोरवाल रस्त्यावर एमएनजीएल गॅस पाईपलाईन गळती

बुधवारी राज्य मानवाधिकार आयोगाचे विशेष पथक थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धडकले. दिवसभर चाललेल्या या उच्चस्तरीय चौकशीदरम्यान पथकाने घटनेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली, सखोल चौकशी केली आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले.Pune Police
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
आयोगाच्या या धडक कारवाईनंतर प्रशासकीय पातळीवर तातडीने पावले उचलत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांची रवानगी विशेष शाखेत करण्यात आली. जरी प्रशासकीय बदलांना नियमित प्रक्रियेचा भाग म्हटले जात असले, तरी मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानिकडेच या बदलीचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. मानवाधिकार आयोगाची अंतिम चौकशी अद्याप सुरू असून, अहवालानंतर या प्रकरणात आणखी काही कठोर प्रशासनिक व कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.


