Skip to content

Pune News : अॅटमबॉम्बवर बंदी आणि नागरिकांना सुरक्षेचे आवाहन ; पुणे पोलीस आयुक्तालयाची दिवाळीसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर

Pune News :पुणे: दिवाळी सणानिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालय सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

अॅटमबॉम्बवर बंदी आणि नागरिकांना सुरक्षेचे आवाहन ; पुणे पोलीस आयुक्तालयाची दिवाळीसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर
अॅटमबॉम्बवर बंदी आणि नागरिकांना सुरक्षेचे आवाहन ; पुणे पोलीस आयुक्तालयाची दिवाळीसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर

Pune News :पुणे: दिवाळी सणानिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालय सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. फटाक्यांची विक्री आणि आतिषबाजी करताना कोणतेही अपघात किंवा कायदेशीर अडचण येऊ नये, यासाठी पुणे शहर पोलिसांनी कायदेशीर तरतुदी आणि नियमावली प्रसिद्ध केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी जाहीर केलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शस्त्र अधिनियमांन्वये अॅटमबॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेल्या आणि ठराविक वजना-आकाराच्या दोऱ्याने गुंडाळलेल्या फटाक्यांच्या उत्पादनावर, बाळगण्यावर व विक्रीवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये, पदपथांवर किंवा रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू, फटाके फोडणे, फायर बलून किंवा अग्निबाण उडवण्यास वर्षभर मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल..https://maharashtramirror.com/ Pune News

फटाके विक्री परवाना आणि वेळ मर्यादा


दिवाळीनिमित्त तात्पुरते फटाके विक्री परवाने ६ नोव्हेंबर २०२६ ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत दिले जाणार आहेत. मुदत संपल्यानंतर शोभेची दारू किंवा फटाके विकता येणार नाहीत. उरलेला साठा परवानाधारक गोदामात किंवा घाऊक विक्रेत्याकडे परत करणे बंधनकारक आहे. तसेच विदेशी मुळांचे फटाके विकण्यास सक्त मनाई करण्यात आली असून स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतिषबाजी करण्यास बंदी आहे.

ध्वनी आणि वायू प्रदूषण नियमांचे पालन


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, फटाके उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आहे. साखळी फटाक्यांच्या बाबतीतही आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत आवाज करणाऱ्या फटाक्यांवर संपूर्ण बंदी असणार आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर क्षेत्रातील शांतता प्रभागात कोणत्याही वेळी फटाके फोडता येणार नाहीत. नागरिकांनी कमी ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या 'ग्रीन फटाक्यांचा' वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, स्फोटक कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण नियमांनुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित दिवाळी साजरी करावी आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share